आरती ज्ञानराजा
आरती ज्ञानराजा ! महा कैवल्यतेजा ! सेविति साधुसंत ! मनु वेधला माझा !! १ !!
लोपले ज्ञानजगी ! हितनेणती कोणी! अवतार पांडुरंग ! नाम ठेविले ज्ञानी!!
कनकाचे ताटकरी ! उभ्या गोपिका नारी ! नारद तुंबरू हो ! साम गायन करी !! २ !!
प्रकट गुहय बोले ! विश्व ब्रम्हची केले ! राम जनार्दनी ! पायी मस्तक ठेवीले !! ३ !!